मुंबई: राज्यात शिवसेना भाजपा संघर्ष दिवसेंदिवस वादगत असून आज पुन्हा एकदा सामना मधून घणाघात करण्यात आला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. असा घणाघात आज सामना मधून करण्यात आला आहे. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे तसेच अमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींववर नुकतीच करण्यात आली होती. या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार म्हणाले कि आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून बरीच ‘ऍसिडिटी’ फ्लश झाली असल्याचा टोला लगावला आहे.
काय म्हणाले शेलार?
सामना च्या टीकेला टीकेला शेलार यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘‘तपास यंत्रणा शिवसेनेला आता विंचू, मगरी सारख्या वाटतात. पण २५ वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केला त्याचं उत्तर कोण देणार? शिवसेना नेमकी कोणत्या गोल्डन गँग विषयी इशारे देत आहे?” अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडली”, असेही शेलार म्हणाले.
सामना त ‘ऍसिडिटी” फ्लश झाली”
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छातीठोकपणे सांगितलं, की ‘एक अकेला कितनों पर भारी है…!’ हे शब्द काही व्यक्तिना ‘धौतीयोग’ सारखे लागले असून ज्यांना ही मात्रा लागू पडली, त्यांना मळमळ, जळजळ होणारच आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून बरीच ‘ऍसिडिटी” फ्लश झाली आहे”, अशी जहरी टीकाही त्यांनी केली.
अग्रलेखात काय म्हटलं होतं?
‘‘पंतप्रधान मोदी छातीवर मूठ मारून जे सांगतात की, ‘मैं अकेला लढ रहा हूं और सबको भारी पड रहा हूं’ हे काही खरे नसून विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे त्यांनी पाळून ठेवले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्ह, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दानगी नाही”, अशी टीका सामनातून करण्यात आली होती. तसेच ‘‘हाती पोलीस, न्यायालय, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज ठेवून ‘मी एकटाच लढत असून सगळ्यांना भारी पडत आहे’ असे सांगणे मजेशीर आहे व ही मजा फक्त मोदीच करू शकतात. अशी मजा आपल्या देशात गेली सात-आठ वर्षे सुरू आहे,” असा टोलाही सामनात पंतप्रधान मोदींना लगावण्यात आला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम