द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर, सगळीकडे वेगवेगळ्या लसीचा वापर सुरू झाला. भारतात (India) देखील कोव्हक्सीन (Covaxin) आणि कोविशील्ड (Covishield) चा वापर सुरू झाला. मात्र अनेक पाठपुराव्यांनंतर देखील लसींना जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मान्यता भेटत नव्हती.
मात्र आता भारतासाठी (India) खुशखबर (GoodNews)आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील कोव्हक्सीन ला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. WHO कडून मंजुरी भेटत नसल्याने कोव्हक्सीन घेतलेल्या नागरिकांना परदेश गमनास अडचणी उद्भवत होत्या. मात्र आता WHO ने परवानगी दिल्याने भारतीय नागरिकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता पर्यंत, बऱ्याच देशांत कोव्हक्सीन घेतलेल्या नागरिकांना अडचण येत होती. मात्र, आता WHO नेच शिक्कामोर्तब केल्याने; भारताचा मार्ग मोकळा झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम