देवळ्याचा महेश बच्छावचा प्रामाणिक पणा; सापडलेले १ लाख ८० हजार रुपये केले परत

0
39
देवळा / देवळा येथे सापडलेले १ लाख ८० हजार रुपये कामगाराकडे परत करताना महेश बच्छाव समवेत व्यापारी कैलास शेवाळकर ,सोनजे , गहिडे , सुरेश खुडे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा | सोमनाथ जगताप
देवळा येथील बौद्ध वासी काकासाहेब सोनवणे यांचे मानस पुत्र महेश बच्छाव याने रस्त्यावर सापडलेले 1 लाख 80 हजार रुपये परत करून प्रामाणिक पणाचे दर्शन घडविले. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल देवळा शहर व तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

देवळा / देवळा येथे सापडलेले १ लाख ८० हजार रुपये कामगाराकडे परत करताना महेश बच्छाव समवेत व्यापारी कैलास शेवाळकर ,सोनजे , गहिडे , सुरेश खुडे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

याबाबत अधिक माहिती अशी की ,देवळा येथे शनिवारी दि ४ रोजी सटाणा येथील ठेप चे व्यापारी बाळासाहेब राका यांनी आपल्याकडे कामगार असलेल्या मुलाला देवळा येथील स्वामी समर्थ किराणा दुकानाचे व्यापारी सोनजे यांच्याकडे असलेली बाकी घेण्यासाठी पाठवले होते. सोनजे यांनी या कामगाराकडे आपल्याकडे असलेली मालाची बाकी १ लाख ८० हजार रुपये दिले. सदर कामगार मुलगा हे पैसे घेऊन दुचाकीने सटाण्याच्या दिशेने जात असतानाच देवळा येथील ऍग्रो मॉलसमोर रस्त्यावर हे पैसे पडले. बरेच अंतर पार केल्यानंतर पैसे रस्त्यावर पडल्याचे ह्या कामगाराचे लक्षात आल्यावर तो भयभीत झाला. परत देवळ्याला येऊन त्याने व्यापारी सोनजे यांना तुम्ही मला दिलेले पैसे रस्त्यावर पडल्याचे सांगताच तेही काही काळ स्तब्ध झाले. व ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र हे पैसे देवळा येथील महेश बच्छाव याला सापडले. बच्छाव हा नजीकच असलेल्या येथील आर के प्रोव्हिजन मध्ये काही वस्तू घेण्यासाठी गेल्यावर याठिकाणी पैसे हरवल्याची चर्चा सुरू असतानाच बच्छाव याने मला पैसे सापडल्याचे सांगितले. त्याने आर के मॉलचे संचालक कैलास शेवाळकर यांच्या मध्यस्तीने सदर ठेप व्यापारी राका व कामगाराला बोलून पैसे परत केले. बच्छाव याच्या ह्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पैसे सापडल्या बद्दल व प्रमाणिक पणे परत केल्याबद्दल संबंधित कामगारकडून देण्यात येणारे बक्षीस देखील बच्छाव याने नाकारल्याचे सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here