वसाकाचे ‘टर्बाइन व अलटीमेटर’ इतरत्र नेण्याचा डाव उधळला

0
17
पत्रकार परिषदेत बोलतांना वसाकाचे माजी चेअरमन शांताराम तात्या आहेर ,समवेत सभासद पंडितराव निकम

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या भाडेकरू संस्थेने गेल्या ३० वर्षांपूर्वी बसवण्यात आलेला टर्बाइन व अलटीमेटर खोलून आपल्या मालकीच्या इतर कारखान्याकडे नेत असल्याचे निदर्शनास आल्याने वसाकाचे माजी चेअरमन तथा माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांनी हा प्लॅन आज उधळून लावला.

पत्रकार परिषदेत बोलतांना वसाकाचे माजी चेअरमन शांताराम तात्या आहेर समवेत सभासद पंडितराव निकम

भाडेकरू संस्थेने वसाकाचा कोणताही स्पेअर परत सभासदांच्या परवानगी शिवाय इतरत्र नेण्याचा प्रयत्न केल्यास वसाकाचा सभासद अवसायक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील असा इशारा माजी आमदार शांतारामतात्या आहेर व राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष व सभासद पंडितराव निकम यांनी बुधवारी (दि ३) रोजी पत्रकार परिषदेत दिला.

वसाका कारखाना २५ वर्षे भाडेतत्त्वावर चालवणाऱ्या धाराशिव कारखान्याच्या काही संचालकांनी सुमारे दीड कोटी रुपयांचा वसाकाचा चालू स्थितीतील टर्बाइन व अलटरनेटर खोलून इतरत्र चालविण्यात येणाऱ्या कारखान्यात नेण्याचा प्रकार सकाळी सुरू केला. ही वार्ता कारखान्यासह परिसरात वाऱ्याच्या वेगाने फिरली. वसाकाच्या काही हितचिंतकांनी हा प्रकार कारखान्याचे माजी चेअरमन व माजी आमदार शांतारामतात्या आहेर व त्यांचे समर्थक पंडितराव निकम यांच्या कानावर टाकले असता त्यांनी कारखाना कार्यस्थळावर ते हजर झाले. याबाबत प्रत्यक्ष शहनिशा केला असता वसाकाचा टर्बाइन इतरत्र नेत असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत धाराशिव कारखान्याचे संचालक आबासाहेब खरे व जनरल मॅनेजर पठाण यांच्याकडे चौकशी केली असता सदर टर्बाइन व आल्टरनेटर आम्ही चालवत असलेल्या सहकारी कारखान्यावर नेत असून काही दिवसांनी परत घेऊन येऊ असे सांगितले. वसाका हा धाराशिव कारखान्याला भाडेतत्वाने दिला असून यंत्र सामग्री इतरत्र नेण्यासाठी दिलेला नाही अशी कडक भूमिका माजी आमदार आहेर यांनी घेतल्याने सदर टर्बाइन व अलटरनेटर आम्ही अवसायकांच्या परवानगीने नेण्यात येईल असे सांगितले असता माजी आमदार श्री.आहेर यांनी वसाका हा शिखर बँकेने तुम्हाला चालवायला दिला आहे.

अवसायक यंत्रसामुग्री इतरत्र देणारे कोण असा कडक सवाल केला. धाराशिव संचालकांनी नरमाईची भूमिका घेतली. धाराशिव कारखान्याने वसाकाची कोणतीही यंत्रसामुग्री अथवा इतर साहित्य वसाका प्रवेश द्वाराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्यास अवसायकांच्या कार्यालयासमोर वसाकाच्या सभासदांसमवेत धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

 वसाका धाराशिव कारखान्याला २५ वर्षे चालविण्यास देऊन सभासदांच दिशाभूल करण्यात आली असून आजच्या चोरीचे प्रकरण भाडेकरू संस्थेकडून उघड झाल्याने कारखान्याचे नुकसान होत आहे. राज्य शिखर बँकेने आपल्या घेण्यापोटी वसाका भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला असला तरी शिखर बँकेचे प्रतिनिधी अधिकारी व कारखाना कार्यक्षेत्रातील अभ्यासू जाणकार ज्येष्ठ पाच संचालक यांचे प्रशासकीय मंडळ नेमून हा कारखाना सात वर्षांत पूर्णपणे कर्जमुक्त करू. –शांतारामतात्या आहेर ,माजी चेअरमन

वसाका कारखाना भाडेपट्ट्याने चालविण्यास घेणाऱ्या धाराशिव कारखान्याने आज सकाळी वसाकाचा चालू स्थितीतील टर्बाइन व अलटरनेटर खोलून इतरत्र नेण्याचा प्रकार निदंनिय असून वसाकाची कोणतीही यंत्रसामग्री अथवा एक नटबोल्ट ही बाहेर जाऊ दिला जाणार नाही.- पंडितराव निकम

 साखर कारखाने एकमेकांना लोनबेसिसवर यंत्रसामग्री ची देवाणघेवाण करतात. यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी घेतली जाते. या वसाका कारखाण्यासाठीही दुसरीकडून आम्ही काही साहित्य आणत असतो. कारण असे साहित्य तातडीने मिळत नाही त्यासाठी हा पर्याय स्वीकारावा लागतो. या कारखान्याची कोणतीच वस्तू इतरत्र जाणार नाही.

-आबासाहेब खरे , संचालक धाराशिव युनिट


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here