सोमनाथ जगताप | देवळा ; खर्डे ते ओहळबार (भऊर फाटा ) या रस्त्याचे काम सुरु करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खर्डे ते ओहळबार ह्या रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी ,अशी मागणी करण्यात आली होती.

आमदार डॉ राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून आदिवासी विकास योजनेंतर्गत सदर काम मंजूर झाल्याने या कामाच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांसह या मार्गावरून ये जा करण्याऱ्या इतर वहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यावर आलेल्या नाल्यांवर पुलाचे देखील बांधकाम करण्यात येत असल्याने अवजड वाहतूक देखील सुकर होणार असून , उर्वरित ठिकाणी देखील फरशी पुलाचे काम हाती घ्यावे , अशी मागणी करण्यात आली आहे .
खर्डे व परिसरात नागरिकांना कळवण ,देवळा , भऊर आदी ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. मात्र खराब रस्त्याअभावी वहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान ,आमदार निधीतून या रस्त्याचे काम सुरु झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम