खर्डेत प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
53
खर्डे येथे विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करतांना सरपंच अर्जुन मोहन,उपसरपंच सुनील जाधव आदींसह ग्रामस्थ व समाज बांधव

देवळा : खर्डे ता देवळा येथे प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील श्रीराम मंदिराच्या आवारात उभारण्यात आलेल्या पेंडॉल मध्ये सकाळी प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे सरपंच अर्जुन मोहन, उपसरपंच सुनील जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

खर्डे येथे विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करतांना सरपंच अर्जुन मोहन,उपसरपंच सुनील जाधव आदींसह ग्रामस्थ व समाज बांधव

याप्रसंगी गावातील बहुतांश नागरिकांनी प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेलापुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. जयंतीनिमित्त सुतार लोहार संघटनेचे कार्यकर्ते सोमनाथ जगताप ,संजय कुवर यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास समाज बांधव सर्वश्री किसन कुवर , ह भ प तानाजी जगताप, रामकृष्ण कुवर , ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गोकुळ जगताप , दीपक कुवर , किशोर जगताप ,भास्कर कुवर , भानुदास जगताप , पिंटू मिस्तरी, चेतन जगताप ,स्वप्नील जगताप ,दादा मिस्तरी ,साहेबराव जगताप ,नंदू जगताप , रोशन कुवर, मंगेश जगताप , प्रमोद खैरनार ,गणेश जगताप ,अनिकेत कुवर ,मनीष जगताप ,हर्षल जगताप ,तन्मय जगताप , मयूर जगताप, सार्थक कुवर ,गौरव जगताप आदींसह आबालवृद्ध व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here