Milk Price : महागाईचा आणखी एक झटका! 

0
41

दिल्ली : Milk Price – अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोनच दिवसात देशातील साधारण जनतेला मोठा झटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी दूध वितरक कंपनी अमुलने आपल्या दूधाच्या किमतीत प्रतिलीटर ३ रुपयांची वाढ केली आहे. अमूल कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात दरवाढीची माहिती दिली आहे.

अमूल कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात दरवाढीची माहिती दिली असून नवे दर आजपासूनच म्हणजेच ३ फेब्रुवारीपासून लागू केले जाणार आहेत. कंपनीच्या माहितीनुसार आता अमूलची अर्धालीटर दूधाची पिशवी २७ रुपयांना मिळणार आहे. तर एक लीटर दूधासाठी ५४ रुपये मोजावे लागणार आहेत.

ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा; गिसाका शेअर्स प्रकरणी केली चौकशीची मागणी

अमूल गोल्ड म्हणजेच फुल क्रीम दूधाचं अर्धा लीटरचं पाकिट आता ३३ रुपयांना मिळणार आहे. तर एका लीटरसाठी ६६ रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गायीच्या दूधाची एका लीटरची किंमत आता ५६ रुपये एवढी झाली आहे. तर अर्धा लीटर दुधासाठी २८ रुपये द्यावे लागणार आहेत. तर म्हशीचं A2 दूध आता ७० रुपये प्रतिलीटर किमतीला बाजारात उपलब्ध होईल.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here