Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) निवडणूकीच्या मतमोजणीस (Vote Counting) सुरुवात झाली असून याठिकाणी सत्यजीत तांबे आघाडीवर आहेत यामुळे तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवाला सूरवात केली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात मत बाद झाली आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.28 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंपरी येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे उपस्थित होते.
राज्यातील पाच शिक्षक पदवीधर मतदारसंघात आज मतमोजणी सुरू आहे मात्र या सर्वात नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आहे. या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यातील 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. त्यानंतर सर्व मतपेट्या उघडण्यात आल्या असून मतमोजणी सुरु झाली आहे. जवळपास 28 टेबलवर मतमोजणी चालणार आहे, पहिल्या पसंतीचा कल पुढे पुढे आला असून तांबे आघाडीवर असल्याची माहिती आहे.
कसे आहे मतमोजणीचे नियोजन
एका टेबलवर एक हजार मतांची मोजणी होईल. या एका टेबलवर तीन अधिकारी उपस्थित असतील यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. सुरुवातीला 25-25 चे गठ्ठे तयार करण्यात येऊन ते एकमेकांत मिसळले जातील, सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. यातून वैध मते काढून मतमोजणाला सुरुवात होईल. या प्रक्रियेला सुमारे चार तास लागतील. तर नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीचं ठिकाण हे सय्यद पिंपरी आहे मतमोजणीच्या वेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. मात्र मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल बंद राहणार आहेत.
मतमोजणी कशी असणार?
सुरुवातीला मतमोजणीच्या वेळी वैध मतदानाच्या आधारावर कोटा ठरवला जाईल. वैध मताला दोनने भागून एक आकडा मिळविला की कोटा ठरवला जातो. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळवून कोटा पूर्ण झाल्यास त्याला विजयी घोषित करण्यात येईल. कोटा पूर्णच झाला नसेल तर पहिल्या पसंतीची मते ज्याला सर्वांत कमी मिळाली त्या उमेदवाराला बाद ठरवून त्याच्या मतपत्रिकेत मतदाराने दुसरा पसंतीक्रम कुणाला दिला त्यानुसार मतमोजणी केली जाते. मतपत्रिकेत पसंतीक्रम शब्दांत नोंदवणे, एकाच उमेदवारांच्या समोर 1, 2, 3 असा क्रम लिहिणे असे आढळल्यास ही मते अवैध ठरविण्यात येतात. केंद्रात असलेल्या जांभळ्या शाईच्या पेनाऐवजी इतर पेन वापरला तर मत अवैध ठरते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेरच मतदारांचे स्वत:चे पेन जमा करण्यात आले होते. मतदारांना जांभळ्या रंगाचा विशिष्ट पेन निवडणूक आयोगाकडूनच देण्यात आला आहे. प्रथम पसंती दर्शवली नसल्यास मत अवैध ठरते. कोणाची मते अवैध ठरली, हे मतमोजणी करताना निदर्शनास येईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम