अहमदाबाद : ICC T-20 च्या India vs New Zealandच्या तिसऱ्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे.टॉस जिंकून भारताने पाहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.शुभमन गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध २३५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात सामना रंगला.सलामीवीर शुभमन गिल जोरदार फॉर्ममध्ये होता आणि त्याने 63 चेंडूत 12 चौकार आणि सात षटकारांसह नाबाद 126 धावांची खेळी केली आणि त्याच्या संघाला 235 धावांचे लक्ष्य ठेवण्यास मदत केली. दरम्यान, राहुल त्रिपाठीही चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याने 22 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांसह 44 धावा केल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजीसाठी मायकेल ब्रेसवेल, ब्लेअर टिकनर, इश सोधी आणि डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
New Zealand च्या डॅरिल मिशेलने 35 धावा केल्या, तर Indian Cricket Team Captain हार्दिक पांड्याने 4 विकेट्स घेतल्या. गोलंदाजीने मॅच मध्ये रंजक वळण आणली.अर्शदीप, उमरान आणि मावीने प्रत्येकी २ बळी घेतले. आज रात्री भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीने १३ व्या ओव्हर मध्ये New Zealand चे सर्व खेळाडू बाद करून मॅच संपविण्यात आली.
Match Score-
IND 234/4 (20)
NZ 66 (12.1)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम