देवळ्यात माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप; बाजार समिती आवारात शुकशुकाट

0
36
देवळा येथील माथाडी कामगारांच्या वतीने बाजार समितीचे सचिव माणिक निकम तसेच सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना निवेदन देतांना तालुका अध्यक्ष भावराव नवले , अनिल आहेर , राजेंद्र बच्छाव ,विजय आहेर आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा :माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकामी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवार दि .( 1.) रोजी पुकारलेल्या माथाडी कामगारांच्या राज्यव्यापी ” लाक्षणिक संपात ” देवळा येथील माथाडी कामगार सहभागी झाले होते.

देवळा येथील माथाडी कामगारांच्या वतीने बाजार समितीचे सचिव माणिक निकम तसेच सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना निवेदन देतांना तालुका अध्यक्ष भावराव नवले , अनिल आहेर , राजेंद्र बच्छाव ,विजय आहेर आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

यामुळे आज देवळा बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट दिसून आला . यावेळी माथाडी कामगारांच्या वतीने तालुका अध्यक्ष भावराव नवले यांच्या नेतृवाखालील शिष्टमंडळाने बाजार समितीचे सचिव माणिक निकम तसेच सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले . निवेदनाचा आशय असा कि ,बाजार समितीमध्ये माथाडी संघटनेचे नोंदणीकृत असलेले माथाड़ी कामगार हे बाजार समितीत अनुषंगीक कामे करतात. या कामगार संघटनेने शासनाकडे प्रलंबित असलेल्या आपल्या मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदने सादर केली आहेत . मात्र शासनाने अद्याप या प्रश्नाची सोडवणूक केली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

शासनाने याची दखल घ्यावी यासाठी आज माथाडी कामगार युनियनच्या वतीने राज्यभर लाक्षणिक संप पुकारला असून , या संपात देवळा येथील माथाडी कामगार सहभागी झाल्याने बाजार समितीच्या आवारात कांद्यास भुसार मालाचा लिलाव बंद असल्याने शुकशुकाट दिसून आला. यावेळी तालुका अध्यक्ष भावराव नवले, राजेंद्र बच्छाव, भाऊसाहेब देवरे , बाळू आहेर , विजय आहेर , दादा देवरे ,संदीप देवरे ,अशोक सोनवणे ,अनिल आहेर ,भाऊसाहेब गुंजाळ आदी कामगारांनी संपात सहभागी होऊन आपल्या प्रलंबित मागण्याचे निवेदन सादर केले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here