Mathadi strike: माथाडी कामगारांचे राज्यभर लाक्षणिक कामबंद आंदोलन

0
32

Mathadi strike : माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक संपात सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व माथाडी-मापाडी कामगारांनी सहभागी होऊन आपली मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी काम बंद आंदोलन केले.

माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र राज्य कामगार युनियनचे नेते, सरचिटणीस तथा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही मागण्या पूर्ण न झाल्याने पाटील यांनी राज्यभर लाक्षणिक संपाची घोषणा करत कामगारांना सहभागी होण्याचे आव्हान केले होते. या संपात राज्यभरातील कामगारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने राज्यभर सर्वच बाजार समित्यांचे कामकाज बंद होते.

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आले मात्र शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने हा संप पुकारण्यात आला.आजच्या लाक्षणिक संपाचा विचार करता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलनाची तीव्रता भविष्यात मोठी असेल असा इशाराही युनियन मार्फत देण्यात आला आहे.

या संपात सहभागी होत सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्वच माथाडी-मापाडी कामगारांनी बाजार समितीच्या कार्यालयासमोर तसेच मुख्यप्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यावेळी माथाडी कामगार संचालक संदीप साळे, मापाडी अध्यक्ष बाजीराव सोनवणे, हमाल प्रमुख भगवान भारती, मापाडी प्रमुख धनंजय भामरे ,समाधान भदाणे, भास्कर सोनवणे ,बापू पवार, तसेच सर्व माथाडी मापाडी कामगार उपस्थित होते तसेच मापाडी सदस्य उदय सोनवणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना आज केलेल्या आंदोलनाचा सरकराने गांभीर्याने विचार न केल्यास भविष्यात संघटनेच्या मार्गदर्शनानुसार होणाऱ्या तीव्र आंदोलनात सर्वानुमते सटाणा बाजार समिती माथाडी मापाडी युनियन तर्फे सहभाग नोंदविण्याचा इशारा दिला आहे.

अशा आहेत मागण्या-
नाशिक जिल्ह्यातील माथाडी-मापाडी कामगारांच्या हक्काच्या लेव्ही प्रश्नाची तात्काळ सोडवणूक व्हावी.

शासन निर्णयानुसार खासगी बाजार समितीतील कामे प्रचलित बाजार समितीतील परवानेधारक व नोंदणीकृत कामगारांनाच मिळावी.

माथाडी व मापाडी कामगारांच्या भरतीबाबत कामगार विरोधी आदेश रद्द व्हावेत.

माथाडी मंडळात नोंदीत कामगारांच्या मजुरीची रक्कम वेळेवर मिळावी.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here