पदवीधरांची मतदानाकडे पाठ; तालुक्यात फक्त 52.13% मतदान

0
44
देवळा येथे मतदानासाठी अपंग मतदाराला घेऊन येत असतांना सहकारी तर दुसऱ्या छायाचित्रात मतदान केल्याची खून दाखवितांना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात आज झालेल्या निवडणुकीत देवळा तालुक्यात ५२.१३ टक्के मतदान झाले. २३९२ मतदारांपैकी १२४७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

देवळा येथे मतदानासाठी अपंग मतदाराला घेऊन येत असतांना सहकारी तर दुसऱ्या छायाचित्रात मतदान केल्याची खून दाखवितांना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर ( छाया -सोमनाथ जगताप )

तालुक्यात जिल्हा परीषद मराठी मुलींची शाळा देवळा येथे दोन तर उमराणे येथे एक अशा तीन मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. त्यात देवळा येथील पहिल्या मतदान केंद्रावर १००० पैकी ६२२ ( ६२.२० % ), दुसर्या मतदान केंद्रावर १०५९ पैकी ४५८ ( ४३.२५ % )व उमराणे येथील मतदान केंद्रावर ३३३ पैकी १६७ ( ५०.१५ % )असे तिन्ही केंद्रांवर एकूण ५२.१३ टक्के मतदान झाले. ९८८ पुरूष व २५९ महिला पदविधा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला १६ उमेदवार व शेवटचा ‘नोटा’ पर्याय अशा १७ रकान्यांची अडीच फुटांची मतपत्रिका मतदारांच्या चर्चेचा विषय राहिली.

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. याठिकाणी महाविकास आघाडी , भाजप आदींसह इतर उमेदवारांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here