देवळा | सोमनाथ जगताप
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या देवळा येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी विनोद बाजीराव शिंदे यांची तर व्हा चेअरमन पदी दीप्ती धनंजय आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली . या संस्थेची ८ जानेवारी रोजी सार्वत्रिक झाली.

निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलने सात जागा जिंकून बहुमत सिद्ध केले. आज सोमवार दि २३ रोजी चेअरमन ,व्हा चेअरमन पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी विनोद बाजीराव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांना सूचक म्हणून सुभाष आहेर तर अनुमोदक म्हणून डॉ वसंतराव आहेर यांनी स्वाक्षरी केली. तर व्हा चेअरमन पदासाठी दीप्ती धनंजय आहेर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सतीश राणे तर अनुमोदक म्हणून अरुण खरोटे यांनी स्वाक्षरी केली .
यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी संचालक सर्वश्री वंदना आहेर , दुलाजी आहेर , डॉ अविनाश आहेर ,रजत आहेर, पंकज आहेर ,पंडित चंदन, विठ्ठल गुजरे आदींसह माजी चेअरमन पवन अहिरराव ,माजी संचालक नितीन शेवाळकर, दतात्रेय देवरे , धनंजय आहेर , काकाजी शिंदे , जिभाऊ शिंदे , मुन्ना शिंदे , किरण आहेर , संस्थेचे व्यवस्थापक रवींद्र देवरे ,सचिव राजेंद्र देवरे व कर्मचारी उपस्थित होते .
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यानी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला .
नूतन चेअरमन विनोद शिंदे हे दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक आहेत . पतसंस्थेच्या सर्वसामान्य व व्यापारी वर्गातील सभासदांनी भरघोस मतदानाचे दान विनोदच्या पदरात टाकून सर्वाधिक मतधिक्क्याने निवडून दिले. व या संस्थेचे माजी चेअरमन वडील स्वर्गीय बाळासाहेब शिंदे यांनी समाजाशी जपलेले ञणानुबंध याकामी आले. संचालक मंडळाने ही जाणीव ठेवुन माझ्या गळ्यात चेअरमनपदाची माळ टाकली.
आपण जो विश्वास दाखवला त्याला तडा जावु न देता टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल. आज ज्या खुर्चीवर मी बसलो त्याच खुर्चीवर माझे वडील बसले होते. माझ्यामते पतसंस्थेत हे पहिलेच उदाहरण असेल. त्यामुळे हि जबाबदारी मोठी आहे.
– विनोद शिंदे – नूतन चेअरमन
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम