
देवळा : नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा संघटक पदी देवळा येथील निंबा सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा ग्रामसेवक युनियनची आज दि १८ रोजी नाशिक येथे बैठक झाली. या बैठकीत युनियनच्या जिल्हा अध्यक्ष पदी कैलास वाघचौरे यांची फेरनिवड करण्यात आली. तर सरचिटणीस पदी रवींद्र शेलार , संघटक पदी निंबा सूर्यवंशी आदी कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे देवळा तालुका अध्यक्ष योगेश पगार, सचिव संभाजी देवरे, सहसचिव जयश्री आहेर, उपाध्यक्ष -रामकृष्ण अहिरराव, जयश्री निकम , संघटक- सरिता मिस्तरी , नंदू सोनवणे , सल्लागार – जिभाऊ देवरे , लेखापरीक्षक -अनिल आहेर आदींसह राजश्री देसले , पूनम सोनजे , निंबा सूर्यवंशी , अरुण आहेर , विजय सोळसे , यू बी खैरणार , जगन्नाथ शिंदे , श्रीमती सोनार ,वैशाली येळीज यांनी अभिनंदन केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम