
देवळा : तालुक्यात अवैध धंद्यांना उत आल्याने नागरिक त्रस्त झाले होते. कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही ही शंका उपस्थित होत होती. दिवसाआड बाईक चोरी वाळू तस्कर, रोड रोमियो , जुगार यांना कायद्याचा धाक कुठेही दिसून येत नव्हता मात्र सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तालुक्यात धडाकेबाज कारवाई करत अवैध धंद्यांवर टाच आणली असून त्यांच्या तोंडाला फेस आण्याचे काम देवळा पोलिसांनी केले आहे.

गेल्या दोन दिवसात गोवंश तस्कर तसेच वाळू तस्करांना आस्मान दाखवण्याचे काम शिरसाठ यांच्या चमूने केले आहे गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू तस्कराचे 3 ट्रॅक्टर रात्री 2 ते 3 दरम्यान पकडले असून देवळा पोलीस स्टेशन आवारात जप्त केले आहेत पुढील कार्यवाही करीता महसूल विभागाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसापूर्वी एक वाळूचा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला होता. आज मध्यरात्री पुन्हा कारवाई केल्याने वाळू तस्करांची झोप उडाली आहे.
देवळा तालुक्यात नेहमीच वाळू तस्कर डोके वर काढत असतात मात्र त्यांचा कायम स्वरुपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. API शिरसाठ यांच्याकडुन नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून नागरिकांच्या हाकेला सिंघम म्हणून उतरल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यामुळे अवैध धंदे चालकांचा कर्दनकाळ म्हणून शिरसाठ यांची ओळख जनमानसात रुजत आहे.
सदर कारवाइची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप ,अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार -कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांना देण्यात येऊन पुढील कारवाई तहसीलदार विजय सूर्यवंशी करीत आहेत.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार देवळा पोलिसांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य व्यवसायांना चाप बसविला आहे . या धकड मोहीमचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, कारवाई अशीच सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाळू तस्करांची माहीती मिळताच API शिरसाठ पोशि शेख, पोशि कोरडे यांनी लोहणेर माळवाडी रस्ताल्या सापळा रचुन 3 ट्रॅक्टर त्यामध्ये गौणखनिज (वाळु) हे अवैध रित्या वाहतुक करतांना आढळून आले. त्यांना परवाना बाबत विचारपुस करता कुठलाही परवाना नसल्याने देवळा पोलीस ठाण्याच्या आवारात सदर ट्रॅक्टर उभे करुन नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नावगाव खालील प्रमाणे सांगीतल्याची माहिती आहे. 1) मालक संजु उशिरे रा. लोहणेर ता. देवळा, चालक पांडुरंग बाळु वाघ रा. लोहणेर स्वराज कंपनिचे विना नंबरचा, निळ्या रंगाचा मॉडेल क्रमांक. 735 ट्रॅक्टर तसेच विना नंबरची निळ्या रंगाची ट्रॉली, 2) मालक स्वप्निल उर्फ मिरच्या अशोक निकम, रा. लोहणेर ता. देवळा, चालक दिलीप बाबुलाल खैरणार रा. ठेगोडा ता. सटाणा स्वराज कंपनिचे बिना नंबरचा, निळ्या रंगाचा मॉडेल क्रमाक 735 ट्रॅक्टर तसेच विना नंबरची निळ्या रंगाची ट्रॉली 3) मालक भरत जाधव, रा. लोहणेर ता. देवळा, चालक फुला गुलाब पवार रा. लोहणेर ता. देवळा स्वराज कंपनिचे विना नंबरचा, निळ्या रंगाचा मॉडेल क्रमाक. 735 ट्रॅक्टर तसेच विना नंबरची लाल रंगाची ट्रॉली यांचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम