
देवळा : देवळा येथे छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घोषणा देण्यात येऊन छत्रपतींना अभिवादन करण्यात आले.

१६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, म्हणून १६ जानेवारी हा दिवस संभाजी राजे राज्याभिषेक दिन म्हण साजरा केला जातो. भाजपा कार्यकर्ते, शिवराजे मित्र मंडळ, व एकता फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पाच कंदील चौकात शिवस्मारकासमोर छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.
कार्यक्रमास भाजयुमोचे तालुका अध्यक्ष नानू आहेर, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, मुन्ना आहेर, किरण आहेर, धनंजय आहेर, पवन आहीरराव, विजय आहेर, हर्षद भामरे, तुषार आहेर, भूषण आहेर, अतुल आहेर, राजेश आहेर, सार्थक आहेर, विपुल भामरे,नानू देवरे, स्वप्निल आहेर, विकी पवार, महेश पवार, मयुर सोनवणे, मनोज गुजरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम