
देवळा : येथील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केल्याने तालुक्यातील शिवसेनेच्या गटात मोठे खिंडार पडले आहे.

तालुक्यातील शिवसेनेचे ग्रामीण उप जिल्हाप्रमुख देवानंद वाघ हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ होते. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक आंदोलने झाली आहेत. गावं तेथे शाखा स्थापन करून पक्ष वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान होते. तालुक्यातील शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे तसेच आपले खच्चीकरण होत असल्याचे लक्षात येते असल्यामुळे आपण शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी वाघ यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला असून,यात आपला कोणताही स्वार्थ नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान ,गेल्या दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून,आता थेट उप जिल्हाप्रमुख देवानंद वाघ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केल्याने तालुक्यातील शिवसेनेला एक प्रकारे खिंडार पडले आहे. यामुळे तालुक्यात शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून, आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम