भिकण शेख | पेठ
पेठ तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायत तर्फे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरा करण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 विविध उपक्रमा द्वारे साजरे केले जाणार आहे.
या अंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना भरड धान्य लागवडीसाठी प्रेरित करण्यात येत आहे. नागली,वरई आणि बाजरी ही पेठ तालुक्यातील मूलभूत पिके आहेत मात्र काळाच्या ओघात त्यांच्या कमी उत्पादकतेमुळे शेतकरी त्यांच्या पासून दूर गेला.यामुळे कुपोषणाचा प्रश्न वाढला आहे .
केवळ आर्थिक दृष्टीनेच विचार न करता स्थानिक जनतेला कसदार अन्न कसे मिळेल या हेतूने ग्रामपंचायत आडगाव हे तृणधान्य वर्ष साजरे करताना उन्हाळी बाजरी लागवड, नागली वरई इतर भरड धान्य बीज जतन करणे व संवर्धन करणे इत्यादी बाबी करणार आहेत.
याचाच पहिला टप्पा नाविन्यपूर्ण बाब म्हणून उन्हाळी बाजरी चे क्षेत्र वाढवण्याकरिता विविध प्रात्यक्षिक राबवत आहे.ह्या करीता संकिरीत बियाणे वाटप गायधोंड येथे सरपंच सौ रेखा नेताजी गावित यांच्या हस्ते पार पडले.
मकर संक्रात निमित्त भोगी चे विशेष महत्व असते त्याचे औचित्य साधून बाजरी हिवाळ्यात शरीरासाठी किती लाभदायक आहे हे कृषी सहाय्यक महेश वामन यांनी सांगितले.
नेताजी गावित यांनी स्थानिकवान जतन करण्यासाठी विशेष मोहीम घेत असल्याचे सांगितले विविध पीक स्पर्धा, विद्यार्थी वर्गासाठी निबंध स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सांगितले.ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी या निम्मित श्रमदान करून पाच वनराई बंधारे बांधल्याचे सागितले. देवराम खुरकुटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
कार्यक्रमाला पंचायत समिती चे जाधव साहेब ग्रामसेवक गायकवाड तलाठी भोये आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सदर योजना पेठ तालुक्याच्या विकासाकरिता प्रेरणादायी ठरणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी शेलार आणि पर्यवेक्षक साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम