शरदराव पवार पतसंस्थेच्या चेअरमन पदी योगेश शांताराम आहेर

0
38
येथिल शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी योगेश आहेर यांची निवड झाल्यांनतर सत्कार करतांना निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी समवेत संचालक मंडळ ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : येथील शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी योगेश शांताराम आहेर यांची तर व्हा. चेअरमन पदी हिरामण पुंडलिक आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या संस्थवेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.

येथिल शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी योगेश आहेर यांची निवड झाल्यांनतर सत्कार करतांना निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी समवेत संचालक मंडळ ( छाया -सोमनाथ जगताप )

आज गुरुवारी दि १२ रोजी सकाळी ११ वाजता नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसासाठी संस्थेच्या सभागृहात सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली. यावेळी चेरामन पदी योगेश शांताराम आहेर व व्हा चेअरमन पदी हिरामण पुंडलिक आहेर यांचा निर्धारित वेळेत एक एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

यावेळी संचालक सर्वश्री बाळासाहेब मगर , अतुल आहेर , तुळशीराम आहेर ,नानाजी आहेर , नितीन नवले , लिना आहेर ,वनिता शिंदे , पुंडलिक आहेर ,नानाजी आढाव , शंकर बच्छाव आदींसह व्यवस्थापक प्रमोद देवरे , सचिव बापू आहेर ,रोखपाल रमेश जाधव , भिला सोनवणे ,योगेश ( मुन्ना)आहेर , तुषार मोरे ,संदीप आहेर आदी उपस्थित होते . नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here