सटवाईवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विलास भामरे यांची बिनविरोध निवड

0
43
सटवाईवाडी येथे विजय उत्सव साजरा करतांना नवनिर्वाचित उपसरपंच विलास भामरे समवेत लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत भामरे व सदस्य ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा ; सटवाईवाडी ता देवळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विलास भामरे यांची बिनविरोध निवड झाली . सोमवारी (दि ९ ) रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी सरपंच चंद्रकांत दादाजी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .

सटवाईवाडी येथे विजय उत्सव साजरा करतांना नवनिर्वाचित उपसरपंच विलास भामरे समवेत लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत भामरे व सदस्य ( छाया -सोमनाथ जगताप )

यावेळी निर्धारित वेळेत विलास भामरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक विजय देवरे यांनी केली. त्यांना सूचक म्हणून सदस्य शांताराम भालेराव यांनी स्वाक्षरी केली . निवड प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मनीषा नवले ,शालिनी चव्हाण , मानिषा वाघ ,गुलाब पवार ,अंजनाबाई सोनवणे ,सोनाली आहेर ,सतीश आहेर उपस्थित होते.

उपसरपंच पदी विलास भामरे यांची निवड होताच समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. भामरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here