कनकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनुराधा जैन यांची बिनविरोध निवड

0
45
खर्डे - कनकापूर ता देवळा येथील नवनिर्वाचित उपसरपंच अनुराधा जैन यांचा सत्कार करतांना डॉ . किरण शिंदे समवेत सरपंच बारकू वाघ , जगदीश शिंदे आदी सदस्य ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : कनकापूर ता देवळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपच्या अनुराधा तुळशीराम जैन यांची बिनविरोध निवड झाली. आज सोमवारी (दि ९ ) रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी सरपंच बारकू मंगळू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

खर्डे – कनकापूर ता देवळा येथील नवनिर्वाचित उपसरपंच अनुराधा जैन यांचा सत्कार करतांना डॉ . किरण शिंदे समवेत सरपंच बारकू वाघ , जगदीश शिंदे आदी सदस्य ( छाया -सोमनाथ जगताप )

यावेळी उपसरपंच पदासाठी अनुराधा तुळशीराम जैन यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज दाखल झाल्याने यावेळी जैन यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेविका जयश्री आहेर यांनी केली. त्यांना सूचक म्हणून सदस्य जगदीश शिंदे यांनी स्वाक्षरी केली.

निवड प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे ,बिबाबाई बच्छाव , सुशिलाबाई पवार , बिजलाबाई बर्डे ,पांडुरंग पिंपळसे गविंद बर्वे ,जिजाबाई मोरे उपस्थित होते . उपसरपंच पदी अनुराधा जैन यांची निवड होताच समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

यावेळी डॉ. किरण शिंदे , विकास सोसायटीचे चेअरमन नामदेव शिंदे , माजी चेअरमन बापू शिंदे , नानासाहेब शिंदे , माजी उपसरपंच ऍड . तुषार शिंदे , भाऊसाहेब शिंदे , लक्षुमन शिंदे , दादाजी गोसावी , विजय जैन , दिलीप जैन , संजय जैन , तुळशीराम जैन आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here