श्रीरामराव आहेर पतसंस्था निकाल; अटीतटीच्या लढतीत सहकार पॅनलने सत्ता राखली, परीवर्तनची कडवी झुंज

0
40

सोमनाथ जगताप | देवळा
श्री रामराव आहेर पतसंस्थेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आले असून प्रस्थापितांना यात मोठा धक्का बसला आहे. परिवर्तन पॅनल ने सुरवातीपासून प्रचारात आघाडी घेत रणशिंग फुंकले होते त्यांनी राबवलेली प्रचाराची यंत्रणा कामी आल्याने चुरस निर्माण झाली तर सत्ताधारी पॅनलच्या गोंधळात विलंब झाल्याचा फटका त्यांना बसला आहे अवघ्या तीन ते चार दिवसाच्या प्रचाराच्या जोरावर त्यांनी आपली सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. मात्र या ठिकाणी एकहाती सत्तेला सुरुंग लागल्याचे दिसत आहे. एकूण तेरा जागांसाठी मतदान झाले यात सहकार पॅनलला -7 जागा तर परीवर्तन पॅनलला -6 जागा मिळाल्या आहेत.

श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण १६३८ मतदारांपैकी ११४२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७० टक्के मतदान झाले असून सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदान शांततेत पार पडले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल पाटील यांनी काम बघितले तर मतदान प्रक्रिया कामी सहायक निबंधक सुजय पोटे मतदान केंद्रावर लक्ष ठेऊन होते.

विजयी उमेदवार पुढीप्रमाणे

महिला राखीव

दीप्ती धनंजय आहेर – ५५६ – सहकार
वंदना दिलीप आहेर – ५४५ – परीवर्तन

अनुसूचित जाती जमाती

विठ्ठल जीभाऊ गुजरे – ५१५ – परीवर्तन

भटक्या विमुक्त

पंडित बिरू चंदन – ५७६ – सहकार

इतर मागास वर्ग

पंकज रमेश आहेर – ६६० – परीवर्तन

सर्वसाधारण गट 

डॉ वसंतराव आहेर – विजयी – सहकार पॅनल 541
अरुण खरोटे – विजयी – सहकार पॅनल 481
सतीश राणे – विजयी – सहकार पॅनल 488
विनोद शिंदे – विजयी – सहकार पॅनल 572

आहेर सुभाष वामन – विजयी – सहकार पॅनल – 551

डॉ अविनाश आहेर – विजयी – परीवर्तन पॅनल – 483
दुलाजी आहेर – विजयी – परीवर्तन पॅनल – 530
रजत आहेर – विजयी – परीवर्तन पॅनल – 482


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here