महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या देवळा तालुका अध्यक्षपदी दैनिक ‘सकाळ’चे मोठाभाऊ पगार यांची बिनविरोध निवड

0
37
देवळा : तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोठाभाऊ पगार यांचे अभिनंदन करताना राजपाल आहिरे समवेत संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते

देवळा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या देवळा तालुकाध्यक्षपदी दैनिक ‘सकाळ’चे तालुका बातमीदार मोठाभाऊ पगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली . पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा तत्कालीन अध्यक्ष राजपाल आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि.६) रोजी शासकीय विश्रामगृहावर बैठक संपन्न झाली. यावेळी आगामी वर्षाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

देवळा : तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोठाभाऊ पगार यांचे अभिनंदन करताना राजपाल आहिरे समवेत संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते

पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कै मिलिंद पगार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस सुरुवात झाली. गोरख निकम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पत्रकार संघाने वर्षभरात राबविलेले उपक्रम व आगामी वर्षभरातील रूपरेषा याबाबत चर्चा झाली. पंढरपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाची माहिती देण्यात आली. यानंतर २०२३-२४ या वर्षाची नूतन कार्यकारिणी बिनविरोध पद्धतीने निवडण्यात आली.

नूतन कार्यकारिणी याप्रमाणे – अध्यक्ष – मोठाभाऊ पगार, जिल्हा उपाध्यक्ष– राजपाल आहिरे, भिला आहेर; सरचिटणीस- योगेश सोनवणे, संपर्कप्रमुख- विनोद देवरे, जिल्हा प्रतिनिधी – सोमनाथ जगताप, पंडित पाठक; तालुका उपाध्यक्ष – महेश शिरोरे, गोरख निकम संघटक – शुभानंद देवरे, कार्याध्यक्ष – देविदास बोरसे, खजिनदार – अनिल सावंत, सल्लागार – महेश सोनकुळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राजपाल आहिरे व भिला आहेर यांच्या नावाची शिफारस पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. बैठकीस संजय देवरे, बाबा पवार, विश्वास पाटील, राजेंद्र पवार, दिनेश सोनार, मोठाभाऊ मोरे ,शरद पवार , आदींसहbतालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. दरम्यान पत्रकार दिनानिमित्त येथील महारोजगार केंद्राचे संचालक व जाणीव पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब पगार आणि कांदा व्यापारी अमोल आहेर यांनी सर्व पत्रकारांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here