धनंजय मुंडेंचा अपघात, छातीला मार; उपचारासाठी मुंबईला हलवले

0
53

NCP MLA Dhananjay Munde Accident news: राज्यातील आक्रमक असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत असून परळीला जात असताना मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती स्वतः मुंडे यांनी फेसबुकला दिली आहे. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. या अपघातात छातीला किरकोळ मार लागला असून पुढील उपचारासाठी मुंबईला हलवलं जाणार असल्याची माहिती आहे.

“या अपघातात मुंडे यांच्या छातीला दुखापत झाली असून उपचारासाठी मुंबईला हलवलं जाणार आहे. दुपारी दोन वाजता लातूर येथून विमानानं धनंजय मुंडे हे मुंबईकडे उपचारासाठी जाणार आहेत मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे.”

मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत अपघातासंदर्भात माहिती दिली. फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी लिहिलंय की, “मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटी झाल्यानंतर परळीकडे जात असताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला यात छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.” असे पोस्ट मद्ये म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here