द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव आणि देवळा तालुकाध्यक्ष आकाश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त ताहाराबाद येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टायगर ग्रुप चे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव ब्लड बँकेमार्फत हे रक्तदान शिबिर पार पडले.
यावेळी जायखेडा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, भोये, माजी पोलीस अधिकारी मुरलीधर पाटील, फॉरेस्ट विभाग कर्मचारी, बँक कर्मचारी, गावातील सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य, बाजार समिती सदस्य, ज्येष्ठ नागरिक, मोसम परिसरातील शिक्षक, डॉक्टर आदी उपस्थित होते.
यावेळी गावातील शिक्षक नंदन यांनी टायगर ग्रुप विषयी मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम