शिवसेना (ठाकरे ) गटाची देवळ्यात आढावा बैठक सम्पन्न

0
40
देवळा येथे शिवसेनेच्या आढावा बैठकीला उपस्थित पदाधिकारी समवेत ग्रामीण जिल्हा प्रमुख कुणाल दराडे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्रामीण जिल्हाप्रमुख कुनाल दराडे यांच्या अध्यक्षतेखाली देवळा येथील शासकीय विश्रामगृहा वर नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत आगामी काळात होऊ घातलेल्या देवळा बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात आढावा घेण्यात आला व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी व पक्ष बळकट करण्यासाठी परिश्रम
घेण्याचे आवाहन केले.

देवळा येथे शिवसेनेच्या आढावा बैठकीला उपस्थित पदाधिकारी समवेत ग्रामीण जिल्हा प्रमुख कुणाल दराडे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

बैठकीत जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे ,उपजिल्हा प्रमुख देवा वाघ ,शिवसेना तालुकाप्रमुख बापु जाधव आदींच्या उपस्थितीत तालूक्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियूक्ति पत्र व हिन्दुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याची प्रतीमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिवसेनेना पक्षाच्या विचारांचे तालुक्यातील नवनियूक्त दहिवड ग्रा.पं.सदस्य ,मटाणे ग्रामपंचायत सदस्य, वाजगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच व सदस्य , कनकापुर ग्रामपंचायत सदस्य ,खालप ग्रामपंचायत सदस्य व महालपाटणे वि.का.सोसायटीचे सभापती व उपसभापती यांचाहि याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी देवळा तालूक्यातील 25 युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांचाही सत्कार करण्यात आला.

बैठकीस उपजिल्हा प्रमुख, उपजिल्हा संघटक, तालूका प्रमुख, तालुका समन्वयक, तालुका संघटक, उपतालुकासंघक, उपतालुका समन्वयक, गटप्रमुख, गणप्रमुख, देवळा शहर प्रमुख, शहर संघटक, ऊपशहर प्रमुख, ऊमराणे शहर प्रमुख, ऊपशहर प्रमुख, व तालूक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here