बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर; विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं घ्या मनावर!

0
29
CBSE Exam 2024
CBSE Exam 2024

द पॉइंट नाऊ: विद्यार्थ्यांना नवीन वर्षात परीक्षा द्याव्या लागणार असून दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च या दरम्यान तर बारावीच्या परीक्षा या १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिलदरम्यान होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन महत्त्वाचे असणार आहेत तर शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परिक्षेसाठी अर्ज केला आहे ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in ला जाऊन तारीख पत्रकाची PDF डाउनलोड करू शकतात.

डाऊनलोड करा वेळापत्रक

वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी cbse.gov.in किंवा cbse.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी
दहावी, बारावी परीक्षा शेड्युल २०२३ वर क्लिक करावे
त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या दोन वेगवेगळ्या पीडीएफ तुम्हाला स्क्रिनवर दिसतील
विद्यार्थ्यांना दहावी, बारावी परीक्षेची डेटशीट डाऊनलोड करावी

विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून यावेळी ३४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी १०वी आणि १२ वी बोर्ड परीक्षासाठी नोंदणी केली आहे. कोरोना काळात गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here