महाराष्ट्र अनलॉक च्या दिशेने ; धार्मिक स्थळे मात्र बंदच

0
50

नासिक प्रतिनिधी: राज्य सरकारने अनलॉकची नवीन नियमावली आज जाहीर केली आहे. राज्यभरात दुकानांना रात्री ८ वाजेपर्यंत तसेच शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत. आज या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. शासनाच्या याच आदेशाची अंमलबजावणी उद्यापासून राज्यात लागू होणार आहे.

नासिक जिल्ह्यात काय असणार नियमावली…

  1. नासिक शहरात सलून, ब्युटी पार्लर, स्पा, जिम हे रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असेल. मात्र यासाठी ५०  टक्के क्षमतेची मर्यादा असेल. शिवाय वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असणार आहे. तर, रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा सुरू असतील तर बाकी सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

    धार्मिकस्थळ बंद उघडण्यास परवानगी नाही. राज्यभरात धार्मिकस्थळे ही बंदच असणार आहे.
    चित्रपटगृहे, नाट्यगृहे व मल्टिप्लेक्सदेखील पुढील आदेशापर्यंत बंदच असणार आहेत. कृषी, औद्योगिक, नागरी, दळणवळणाची कामे पूर्ण क्षमतेने सुरू असतील.

तसेच सरकारी व खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. याशिवाय जी कार्यालये वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी, असेदेखील सांगण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मागील बैठकीमध्ये जिल्ह्यातील निर्बंध आहे तसेच कायम ठेवण्याचा निर्णय झालेला होता. दरम्यान शासनस्तरावरून नव्याने काही निर्देश आल्यास ते जिल्ह्यात लागू करण्यात येतील. राज्य शासनाकडून प्राप्त आदेश जिल्ह्यात जसेच्या तसे लागू करण्यात येत आहेत. याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू करण्यात येत आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here