
देवळा ; येथील शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली . बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढिलप्रमाणे
योगेश शांताराम आहेर, हिरामण पुंडलिक आहेर, बाळासाहेब प्रभाकर मगर ,अतुल आनंदराव आहेर, तुळशीराम खंडू आहेर, नानाजी पर्वत आहेर, नितीन संतोष नवले ( सर्वसाधारण गट ) , लिना योगेश आहेर, वनिता संतोष शिंदे ( महिला राखीव गट ) पुंडलिक तुकाराम आहेर ( इतर मागासवर्ग गट ) , नानाजी दौतल आढाव ( भटक्या विमुक्त जाती जमाती गट ) , शंकर दगडू बच्छाव अनुसूचित जाती जमाती गट ) याप्रमाणे वरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांनी दिली.
याकामी व्यवस्थापक प्रमोद देवरे व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सहकार क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत आहे. चौकट -शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेने गेल्या ३५ वर्षाच्या स्थापनेपासून बिनविरोध निवडीची परंपरा आजही कायम राखली आहे. सर्वसाधारण गटातून माजी संचालक बळवंत विश्वनाथ अहिरराव यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. संस्था बिनविरोध झाल्याने सभासदांसह सहकार क्षेत्रातुन कौतूक व्यक्त केले जात आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम