खुंटेवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल भामरे यांना तालुकास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान

0
19
खुंटेवाडी येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल भामरे यांना तालुकास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करतांना जिल्हाध्यक्ष सखाराम दरगुडे समवेत माजी सरपंच भाऊसाहेब पगार आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; खुंटेवाडी येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल भामरे यांना तालुकास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने आज रविवारी (दि २५) रोजी नाशिक येथे सन्मानित करण्यात आले .

खुंटेवाडी येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल भामरे यांना तालुकास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करतांना जिल्हाध्यक्ष सखाराम दरगुडे समवेत माजी सरपंच भाऊसाहेब पगार आदी (छाया – सोमनाथ जगताप )

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत संघ ,कॉ राजाराम निकम (आबा) यांचा 17 वा स्मृती दिन सोहळा व ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा मेळावा रविवार दि २५ डिसेंबर रोजी नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियन व ग्रामपंचायत कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय ग्रामपंचायत कर्मचारी पुरस्कार व नाशिक जिल्हा ग्रामपंचायत संघाचा जिल्हास्तरीय राजाराम निकम स्मृती पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे पार पडला .

यावेळी खुंटेवाडी येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल भामरे यांना तालुकास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने आज रविवारी (दि २५) रोजी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाशिक येथे सन्मानित करण्यात आले .या प्रसंगी जि प चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी , कॉ नामदेव चव्हाण ,कॉ राजेंद्र देसले ,व्ही डी धनवटे ,अरुण आहेर, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलास वाकचौरे , कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सखाराम दरगुडे ,सचिव उज्ज्वल गांगुर्डे ,अविनाश रोकडे ,प्रमोद बोरसे ,संतोष गावंडे, केशव डमाले ,योगेश जाधव , खुंटेवाडीचे माजी सरपंच भाऊसाहेब पगार , ग्रामसेवक पूनम सोनजे ,जयश्री निकम आदींसह जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here