नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनसाठी येत्या २५ डिसेंबर रोजी मतदान ; देवळ्यात तिरंगी लढत

0
33

सोमनाथ जगताप | देवळा
नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघ मर्यादित नाशिक संस्थेची थांबविण्यात आलेली निवडणूक येत्या २५ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश महंत यांनी दिली. नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघ मर्यादित नाशिक या संस्थेची सण २०२२-२०२७ या कालावधीची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या आदेशानुसार दि २९ रोजीच्या आदेशान्वेये आहे त्या टप्प्यात थांबविण्यात आली होती .

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचे आदेश दि १४/१२/२०२२ अन्वेय सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविल्या आहेत . येथून पुढे दि २१/१२/२०२२ पासून सुरु करण्या बाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरनाणें निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघ मर्यादित नाशिक या संस्थेच्या सुधारित निवडणूक कार्यक्रमास राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरनाणें दि १५/१२/२०२२ रोजीच्या आदेशान्वेये मंजुरी दिलेली आहे.

यामुळे दि २५ डिसेंबर रोजी यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे . व मतमोजणी दि २६ रोजी होणार आहे. या संस्थेची थांबवलेली निवडणूक होणार असल्याने पुन्हा एकदा राजकीय घडामोडिंना वेग येणार असून , देवळा तालुका संचालक पदासाठी बोनविरोध निवडीचा मार्ग धूसर बनल्याने तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत .

यात सुनील देवरे – वाजगाव , सुभाष गायकवाड – उमराणे , सतीश देशमुख – लोहोणेर यांचा समावेश आहे . एकूण ४६ मजूर सभासद असून , ते कोणत्या उमेदवाराला पसंती देतात हे मतमोजणी नंतर स्पष्ट होईल. मात्र उमेदवार पुन्हा एकदा सभासदांच्या गाठीभेटी घेण्यासाठी कामाला लागले आहेत. ग्रामपंचायती पाठोपाठ मजूर संघाच्या निवडणुकीमुळे पुन्हा तालुक्यात राजकीय वातावरण यानिमित्ताने ठवळून निघणार आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here