भाजपच्या वाचाळ नेत्यांचा देवळा राष्ट्रवादी तर्फे निषेध

0
41
देवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन करताना तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ समवेत योगेश आहेर, पंडितराव निकम,जगदीश पवार ,सुनील आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : बीजेपी च्या नेत्यांची जीभ वारंवार घसरत असून, शाहू फुले आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या या भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषांबद्द्ल केलेल्या अजब विधानाचा देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

देवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन करताना तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ समवेत योगेश आहेर, पंडितराव निकम,जगदीश पवार ,सुनील आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

सोमवारी दि १२ डिसेंबर रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची येथील शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेत बैठक घेण्यात आली. यावेळी वरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ ,जेष्ठ नेते पंडितराव निकम , प्रांतिक सदस्य योगेश आहेर ,जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार ,माजी सभापती उषाताई बच्छाव , महिला शहर अध्यक्षा वनिता शिंदे , युवक तालुका अध्यक्ष सुनील आहेर , शहर अध्यक्ष दिलीप पाटील , नगरसेवक संतोष शिंदे , जगन आहेर ,राजेश आहेर , मनोज गुजरे ,बागुल नाना ,मयूर सोनवणे आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here