दिल्ली : दिल्लीचे तख्त भाजपाला राखण्यात यश आले नाही. हा पराभव भाजपाला स्वस्थ बसू देत नसून चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. त्याला कारणही तसेच आहे आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर AAP नगरसेवकांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले की, “भाजपचा खेळ सुरू झाला आहे. आमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना फोन येऊ लागले आहेत. आमचा एकही नगरसेवक विकला जाणार नाही. आम्ही सर्व नगरसेवकांना सांगितले आहे की, जर त्यांनी फोन केला किंवा भेटायला आले तर त्यांचे रेकॉर्डिंग घ्या. ”
आज MCD निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. एमसीडीच्या 250 पैकी AAP ने 134 जागा जिंकल्या तर भाजपने 104 जागा जिंकल्यात कॉंग्रेसने 9 जागा जिंकल्या. 3 अपक्षही निवडणुकीत विजयी झाले आहेत.
महापौरपदावर भाजपचा मोठा दावा
आम आदमी पार्टीने दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत बहुमताने विजय मिळवला असला तरी आपला मोठा संघर्ष याठिकाणी दिसत आहे, भारतीय जनता पक्षाने बुधवारी सूचित केले की महापौरपदाची निवडणूक अद्याप बाकी आहे आणि चंदीगडमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी विजयी झाले होते तरी आपकडे जागांची संख्या असूनही याठिकाणी महापौर भाजपचाच आहे.
चंदीगडचा उल्लेख केला
भाजपचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले की, आता दिल्लीचा महापौर निवडण्याची वेळ आली आहे. काट्याच्या लढतीत कोणाला संख्याबळ मिळू शकते, नामनिर्देशित नगरसेवक कसे मतदान करतात, इत्यादींवर अवलंबून असेल. उदाहरणार्थ चंदीगडमध्ये भाजपचा महापौर आहे.
चंदीगड महानगरपालिकेच्या 35 प्रभागांच्या निवडणुकीत 14 जागा जिंकून AAP (AAP) सर्वात मोठा पक्ष ठरला, परंतु त्यांना बहुमत मिळाले नाही. भाजपच्या दिल्लीचे प्रवक्ते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी दावा केला की त्यांच्या पक्षाचा शहरात पुन्हा एकदा महापौर असेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम