देवळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; मका चोरणाऱ्या भामट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0
53

देवळा : येथील देवळा बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डातून चोरीस गेलेल्या मका चोराचा देवळा पोलिसांनी शोध लावला असून, यामुळे मका व्यापारी दिनकर गुंजाळ यांनी देवळा पोलिसांचे आभार मानले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि , देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे भुसार मालाचे खरेदीदार व्यापारी दिनकर केदा गुंजाळ हे मका खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी खरेदी केलेला मका बाजार समितीच्या नवीन नवीन मार्केट यार्डात असतो. दि २४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास यातील भरून ठेवलेले ८२ कट्टे ( आजच्या बाजार भावप्रमाणे १ लाख १० हजार रुपये ) किमतीचा जवळपास ५० क्विंटल मका अज्ञात चोरटयांनी चोरून नेला. मार्केट यार्डातून आपला मका चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर गुंजाळ यांनी बाजार समितीकडे तक्रार केली .

यानंतर सचिव माणिक निकम यांनी देवळा पोलिसात या घटनेची तक्रार दाखल केली होती. या घटनेची सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कुसून चौकशी सुरू केल्यावर आज संबंधित चोर अनिकेत जाधव रा पिंपळगाव वाखारी ता देवळा पोलिसांच्या हाती लागला असुन, त्याने चोरी केलेला मका उमराने येथे विकल्याचे निष्पन्न झाले असून, विकलेल्या मक्याचे पैसे व ट्रकटर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी दिली. देवळा पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून चोराचा तात्काळ बंदोबस्त केल्याने मका व्यापारी गुंजाळ यांनी सुटकेचा निविश्वास सोडला असून, पोलिसांचे आभार मानले आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here