प्रियसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्यावर प्रियकर चढला चक्क टॉवरवर! सविस्तर वाचा

0
41

The point now – प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने संतापलेला तरुण टेलिफोनच्या टॉवरवर चढला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो खाली उतरला नाही. यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून त्या तरुणीने व्हिडिओ कॉल केला. आणि त्यानंतर तो तरुण टॉवरवरून खाली उतरला. आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

राजस्थानमधील भिलवाडा येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तरुणीने नंबर ब्लॉक केल्यावर तरुण रागाच्या भरात मोबाईल टॉवरवर चढला. माहिती मिळताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाशी व्हिडिओ कॉलवर बोलायला तरुणीला सांगितले त्यानंतर तो तरुण खूप वेळानंतर टॉवरवरून खाली उतरला. यानंतर पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली तरुणाला अटक केली.हे प्रकरण आहे राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील बदनोर शहराचे. सुमारे दीड तास हा तरुण टेलिफोन टॉवरवर चढला. कसेबसे पोलिसांनी समज देऊन त्याला खाली आणले आणि नंतर अटक केली. त्याचवेळी मुलीच्या वडिलांनी तरुणावर मुलीचा छळ आणि त्रास दिल्याचा आरोप केला आहे.

बडनोर शहरातील रहिवासी असलेल्या प्रकाश प्रजापतीचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या दरम्यान कशाचा तरी राग आल्याने तरुणीने प्रकाशचा नंबर ब्लॉक करून त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशने नगरमधील टेलिफोन टॉवरवर चढून मुलीला समोर आणण्याचे बोलणे सुरू केले. आणि दीड तास तो काही टॉवर वरून खाली उतरला नाही.यादरम्यान टेलिफोन टॉवरजवळ लोकांची गर्दी जमली. माहिती मिळताच तहसीलदार रामजी लाल जाटव, विकास अधिकारी बिहारीलाल शर्मा, सरपंच नरेंद्रसिंग राठोड सहायक पोलिस उपनिरीक्षक रामलाल घटनास्थळी पोहोचले.

माहिती मिळाल्यानंतर पोलिस पोहोचले आणि त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो समजून घेत नव्हता खाली उतरायला तयार नव्हता . यानंतर पोलिसांनी त्याच्या प्रियसीला व्हिडिओ कॉल करायला सांगितले आणि त्याच्याशी बोलायला सांगितले व्हिडिओ कॉल वर बोलणे झाले. यानंतर हा तरुण खाली उतरला. हा तरुण टॉवरवरून खाली उतरताच पोलिसांनी त्याला शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here