द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन व ग्रामपंचायत दहिवड यांच्या संयुक्त विद्यमाने दहिवड गाव व परिसरातील महिलांची गर्भाशय व स्तन कॅन्सर तपासणी करण्यात आली. शिबीराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष राजेंद्र दिघे, सचिव सुमित बच्छाव,प्रकल्प संयोजक केदारनाथ भागवत,सरपंच आदिनाथ ठाकूर, उपसरपंच मनेष ब्राम्हणकार, ग्रामविकास अधिकारी सुर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन वैद्य, प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, चंद्रकांत महाजन आदी उपस्थित होते. यावेळी डॉ ऐश्वर्या गायगोले,उदय निंभोरकर, तंत्रज्ञ आरती जांभुळकर निलिमा वानखेडे आदीसह वैद्यकीय पथकाने तपासणी केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम