आयुष्मान खुरानासमोर भरून आले शहनाजला म्हणाली- लोकांना वाटते मी सहानुभूती घेण्यासाठी हे करते!

0
34

The point now – शहनाज गीलने एक नवीन शो सुरू केला आहे. तिच्या टॉक शोमध्ये शहनाज गिलने अभिनेता आयुष्मानसोबतच्या संभाषणात म्हटले आहे की तिच्या आयुष्यात अनेक भावनिक क्षण आले आहेत.परंतु तिने याबद्दल कोणालाही सांगितले नाही कारण लोकांना वाटते की ती सहानुभूती मिळविण्यासाठी हे सर्व करत आहे. हे सांगितल्यानंतर शहनाजला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिला भरून आले . तिला पाहून आयुष्मानलाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही.

शहनाज तिच्या भावना दाखवणे सहसा टाळते असे तिने सांगितले आहे .बिग बॉस 13 मधील तिच्या क्यूट लूकमुळे आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतच्या तिच्या नात्यामुळे शहनाज गिल नेहमीच चर्चेत असते. आता अलीकडेच तिने ‘देशी वाइब्स विथ शहनाज गिल’ हा चॅट शो लॉन्च केला आहे. ज्यामध्ये तिने अभिनेता आयुष्मान खुरानाला एका एपिसोडमध्ये आमंत्रित केले होते. यादरम्यान दोघेही खूप बोलले. संभाषणादरम्यान आयुष्मान शहनाजला म्हणाले की”तू खूप धैर्यवान आहेस कारण तुला जे बोलायचे आहे ते तु बोलते.” याला उत्तर देताना शहनाज म्हणाली की ती आता भावना दाखवणे टाळते.

लोकांना वाटते की मी सहानुभूती घेतो असे ती शहनाज म्हणाली “माझ्या आयुष्यातही भावनिक क्षण आले आहेत पण मी ते कधीच कोणाला सांगत नाही. कारण लोकांना वाटते की मी सर्वांची सहानुभूती मिळवण्यासाठी या गोष्टी करत आहे.हे बोलल्यावर शहनाज तिचे अश्रू थांबवू शकली नाही शहनाजला रडताना पाहून आयुष्मानही भावूक होतो.

बिग बॉस 13 मध्ये शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जवळीक वाढली होती. जरी दोघांनी कधीही अधिकृतपणे त्यांचे नाते स्वीकारले नाही परंतु दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यानंतर शहनाज पूर्णपणे तुटली. या दु:खातून सावरण्यासाठी तिला खूप वेळ लागला पण हळूहळू ती या कठीण काळातून बाहेर पडली आहे आणि तिच्या व्यावसायिक आयुष्यात पुढे जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here