रुग्णसेवेच्या माध्यमातून ‘भिमेश’ मुतुला, सर्वसामान्यांना देताय आधार

0
63

मुंबई: गेल्या वर्षभरापासून वडिलांना गुडघ्याचा त्रास सुरू झाला अनेक डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेतला आयुर्वेदिक उपचार देखील केले मात्र शस्रक्रिया हाच पर्याय येवून ठेपला. ऑपरेशन म्हटल्यावर मनात भीती येणे साहजिकच आहे कारण knee replacement करणे जरा जोखमीचे वाटत होते. शस्रक्रिया यशस्वी होते की नाही याबद्दल मनात शंका होती. चांगले डॉक्टर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले मात्र डॉक्टर चांगले तितका खर्च वाढणार हा विचार मनाशी होता.

ऑपरेशन संदर्भात आमचे पूर्वाश्रमीचे सहकारी गणेश जगदाळे यांच्याशी चर्चा झाली त्यांना म्हटल शेतीचे उत्पन्न सद्या बिकट आहे आणि दोन लाखापर्यंत एका गुडघ्याचा खर्च आहे हे सर्व आता अशक्य वाटत आहे. तेव्हा जगदाळे यांनी एक नाव सुचवले ते म्हणजे भिमेश मुतुला यांच्याशी एकदा बोल काही मार्ग नक्की निघेल असा दिलासा दिला. मी ओमप्रकाश शेटे सरांच्या संपर्कात आधीपासून होतो मात्र त्यांच्याशी हा विषय बोलणे झाला नाही. सुरवातीला शेटे सरांना कॉल केला मात्र त्यांचा फोन लागला नाही. मग तत्काळ भिमेश मुतुला सर यांना कॉल केला त्यांच्याशी बोलणे झाले सर्व माहिती जाणून घेतली, तुला कॉल करतो म्हणून त्यांनी कॉल ठेवला. मला वाटल आता काही कॉल येत नाही माझ्यासारखे अनेक लोक यांना कॉल करता किती लोकांना मदत करतील मात्र वाट बघू म्हणून मी फोन ठेवला. तिसऱ्या दिवशी मला कॉल आला अन् सांगितले तुला डॉक्टरांचा नंबर पाठवला त्यांच्याशी एकदा बोला. तो नंबर होता सैफी हॉस्पिटलच्या डॉ. शब्बीर झवेरी यांचा मी त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितले आपल्याकडे सवलत शक्य नाही मात्र बोलतो मी. हे बोलण झाल्या नंतर भिमेश मुतुला सरांशी माझे बोलणे झाले त्यांनी सांगितले, मी बोलतो डॉक्टरांशी तुम्ही संदीप काळे सरांशी बोला मी तत्काळ संदीप काळे सरांसोबत बोललो त्यांनी देखील सकारात्मक चर्चा करत लवकरात लवकर मदत होईल यासाठी प्रयत्न केले.

हे सर्व होत असताना भिमेश मुतुला सरांनी कुठलीही ओळख नसताना काहीही जास्त परिचय नसतांना मदत केली आणि एका महिन्यात सैफि हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन झाले. ऑपरेशन नंतर देखील वेळोवेळी विचारपूस केली. या समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याची भावना ज्वलंत झाली. एका बाजूला स्वार्थी लोक अन दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी स्वतःला वाहून दिलेले भीमेश सर यांच्यासारखी मानस सर्वसामान्य नागरिकांना आधार बनताय हेच पुन्हा अधोरेखित झाले. धन्यवाद सर,

– ए. के. सोनवणे, नाशिक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here