द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक मध्ये पोलीस आयुक्त पांडे यांनी नियम कडक केले असून, नियमांची अंमलबजावणी कठोर होणार आहे. कारण नो ‘हेल्मेट, नो कॉर्पोरेशन’ मोहिमेस भाऊबीजेपासून सुरुवात होणार आहे. आज पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी याबाबत सविस्तर आदेश काढले आहेत.
शहरात हेल्मेट परिधान केल्याशिवाय दुचाकीस्वारास पेट्रोल किंवा डीझेल दिले जात नाही. तसेच भाऊबीजपासून हे निर्बंध अधिक कडत होणार असून हेल्मेट नसल्यास सहकार्य केले जाणार नाही. तसेच नियमभंग केल्यास थेट पोलीस ठाण्याची हवा खावी लागणार आहे. आता कुठलेही सहकार्य केले जाणार नसून नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर असल्याने पळवाटा शोधणाऱ्यांची चांगलीच पंचायत होणार आहे.
अनेक ठिकाणी विनाहेल्मेट पेट्रोल भरून देण्यासाठी पंप कर्मचारी, मालक यांच्यासोबत वाद घालण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे निर्बंध अधिक कडक करण्यात येतील असे आयुक्तांनी सांगितले आहे.
नवीन आदेश
- विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल पंप परिसरात बंदी.
- प्रत्येक पेट्रोल पंप चालक याबाबत फलकद्वारे जनजागृती करतील.
- विनाहेल्मेट धारकांना पेट्रोल दिल्यास कडक कारवाई होणार.
- शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, सर्व पार्किंगची ठिकाणे, औद्योगिक वसाहती, शासकीय कार्यालये, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व इतर निमशासकीय कार्याल्येत येथेही विनाहेल्मेट दुचाकीस्वारास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
- सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले असून विनाहेल्मेटधारकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे
- वरील ठिकाणी मालमत्ता ऑफिसर यांनी लक्ष ठेवायचे आहे, नियमांचे पालन न झाल्यास कडक कारवाई होणार आहे
- भरारी पथकांची नजर प्रत्येक ठिकाणी राहणार असून कडक कारवाई होणार आहे
- मालमत्ता ऑफिसरसोबत राडा घातल्यास दुचाकीस्वरावर होणार फौजदारी गुन्हा
या आदेशाची सुरुवात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरु होईल. असे आदेश आज आयुक्त पांडेय यांनी काढले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम