द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; गेल्या एक-दीड महिन्यापासुन देवळा शहरा सह तालुक्यात वीज पुरवठा खंडित होताच जिओचे नेटवर्क गुल होत असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.दीपावली सणापूर्वी यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा जितेंद्र आहेर निवेदनाद्वारे दिला आहे.
देवळा शहरात त्याचबरोबर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जिओचा ग्राहक आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून देवळा शहरातील विज जाताच जिओचे नेटवर्क देखील मोठ्या प्रमाणावर बंद होत आहे. वीज गेल्याबरोबर जिओला रेंज कमी मिळत असते. त्याचबरोबर इंटरनेट पूर्ण बंद पडून कमी नेटवर्क मुळे आवाज न येणे ,कॉल मध्येच कट होणे,कॉल न लागणे,अशा समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत असते.
तालुक्यात सर्वाधिक जिओचे ग्राहक असताना देखील कंपनीकडून ग्राहकांचा विचार न करता अतिशय सुमार दर्जाची सेवा मिळत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. देवळा शहरातील
जिओच्या टॉवर्स असलेल्या ठिकाणी बॅटरीचा बॅकअप नसल्याने विज जाताच नेटवर्क देखील जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दीपावली सनापूर्वी यात सुधारणा न झाल्यास देवळा शहरातील जिओचे टावर असलेल्या ठिकाणी ग्राहकांना घेऊन आंदोलन केले जाईल असा इशारा देवळा नगरपंचायतीचे नगरसेवक जितेंद्र आहेर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
येत्या आठ दिवसात कंपनीकडून कुठलीही कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
जितेंद्र आहेर,नगरसेवक देवळा.
देवळा शहरात विजत जाताच जिओचे नेटवर्क देखील गुल होत असल्याने आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही ही समस्या सुटलेली नाही.
रुपेश लुंकड ,जिओ ग्राहक देवळा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम