देवळा पोलिसांना चोरटे देताय ‘चकवा’ ; पोलिस ॲक्टिव्ह मोडवर मात्र बाईकचोरीचे सत्र थांबेना

0
35

देवळा : देवळा शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून,गुरुवारी दि २४ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास देवळा येथील विठेवाडी रोड वरील घरासमोरून होंडा शाईन क्रमांक( MH४१AD-९७१९) दुचाकी चोरीला गेली आहे . याबाबत दुचाकी मालकाने देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , गुरुवारी(२४) रोजी देवळा येथील पेट्रोल पंपा वरील कर्मचारी अंकुश हिरामण महाजन रा लोहोणेर देवळा यांची दुचाकी होंडा शाईन क्रमांक( MH४१AD-९७१९) पंपावरील कर्मचारी साहेबराव छबू आहेर रा देवळा , विठेवाडी रोड हे त्यांच्या घरी घेऊन आले असता रात्री १२ च्या सुमारास सदर गाडी घरासमोरून चोरीस गेली आहे. आहेर यांनी सदर दुचाकी दिवस भर शोधली असता आढळून आली नाही. यामुळे खळबळ उडाली असून, देवळा शहरात दुचाकी चोरीच्या घटना सतत घडत असल्याने पोलिसांनी यांचा बंदोबस्त करावा ,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या घटनेबाबत देवळा पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे . दुचाकी सापडल्यास संबंधितानी ८८८८०८९५९६.//८३०८४३४२४१ या क्रमांकावर सम्पर्क साधावा .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here