‘सबसे कातील गौतमी पाटील’ लव्हर्सला धक्का! मनसेची पोलिसात तक्रार

0
30

The point nowSwati kadam

मध्यंतरी एक मुलगी विकृतपणे लावणी करताना वायरल झाली मग ते इंस्टाग्राम असो युट्युब असो किंवा इतर कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो. आपल्याला सगळ्याकडे तिची लावणी दिसली होती . जिची लावणी वायरस झाली तिचं नाव गौतमी पाटील हे आपल्या सर्वांनाच माहीत असेल लावणीच्या नावाखाली तिने जे काही विकृत नृत्य केले अश्लील हावभाव दिलेे. त्यामुळे जे खरे कलावंत आहेत त्यांना या प्रकरणाची खूप लाज वाटली. कारण लावणी ही एक सुंदर कला आहे.

गौतमी पाटील ने लावणीच्या नावाखाली विचित्र नृत्य केले आणि अश्लील हावभाव दिले ही लावणी नव्हे.पण या अश्लील डान्समुळे गौतमी फारच वायरल झाली  होती. गौतमी पाटील चा विकृत नृत्याला आवर घाला नाहीतर गृह मंत्रालयाच्या काचा फोडल्या जातील अशी तक्रार मनसे कडून करण्यात आली ते म्हणाले गौतमी पाटील लावणीच्या नावाखाली जो काही अश्लील प्रकार करते त्यामुळे आपले समाज दूषित होत आहे असा आरोप सुद्धा मनसेने केला.

आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो येथे अनेक कलावंत आपली संस्कृती आणि लोकांचे मन जपतात ते आपल्या संस्कृती वरती डाग लागून देत नाही. परंतु त्याच्या अगदी विरुद्ध गौतमी पाटील या काहीतरी विचित्र नृत्य करून अश्लील हावभाव देऊन लावणीच्या नावाखाली वेगळाच प्रकार करत आहेत तिच्या या अश्लील नृत्यावर लवकरात लवकर आवर घाला अशी तक्रार मनसेने जालन्यातल्या सेवली पोलिसात तक्रार दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here