The point now-आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून महाराष्ट्र विद्यालय व चरर्ई येथील ब्राम्हण विद्यालयास प्रोजेक्टर देण्यात आले. डिजिटल शाळेकडे वाटचाल. ठाण्यातील 10 शाळांना केळकर यांनी त्यांच्या आमदार फंडातून असे प्रोजेक्टर दिले आहेत. मुलांच्या शिक्षणाकारिता आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणार असे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.
लॉक डाऊन काळातही आ. केळकर यांनी शेकडो गरीब, गरजू शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाकारिता स्मार्ट फोन चे मोफत वाटप केले होते व तीन महिन्यांचे नेट पॅक ही मोबाईल वर मारून दिले होते. शिवाय त्यांनी त्यांच्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकारिता “स्टडी क्लाऊड” ही मोफत शिक्षण प्रणाली सुरु केली असून त्याचा उपयोग आजही शालेय विद्यार्थ्यांना होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिल्यामुळे त्यांना अभ्यासात अजून मदत मिळाली असे दिसते ज्या गरजू मुलांना अभ्यास करण्याची इच्छा आहे परंतु त्यांना पुरेसे साधन भेटत नसल्यामुळे त्यांचे स्वप्न अपुरे राहते पण अशा काही मदतीमुळे त्यांना पुढे जाण्याचे मार्ग मिळते. आणि अशाच मुलांचे भवितव्य खूप उच्च असू शकते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम