देवळा येथे एनपीएस योजेनेविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0
37
देवळा येथे एनपीएस योजेनेविरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभागी अधिकारी ,कर्मचारी वर्ग ( छाया- सोमनाथ जगताप )

देवळा : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात एनपीएस योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिताची नसून ही योजना हटवून जुन्या पेन्शन योजेनेचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना द्यावा या मागणीसाठी देवळा येथील तहसील कार्यालयात आज दि.२३ रोजी सरकारी कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले.

देवळा येथे एनपीएस योजेनेविरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभागी अधिकारी ,कर्मचारी वर्ग ( छाया- सोमनाथ जगताप ) 

एकच मिशन, जुनी पेन्शन व एनपीएस हटाव अशा प्रकारच्या घोषणा देत कर्मचाऱ्यांनी एनपीएसचा विरोध केला. दि.२१ ते दि.२५ दरम्यान एनपीएस हटाव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात प्रशासन नायब तहसिलदार डी.एस.शेलुकर, निवडणूक नायब तहसीलदार विजय बनसोडे, गोदाम व्यवस्थापक एस.एस. उशीरे, रोहयो अव्वल कारकून मनोज गांगुर्डे, कुळकायदा अव्वल कारकून के. एम.साळवे, महसूल सहाय्यक मनोज पडलवार, हंसराज खैरनार, एन.टी.थोरात, समाधान पवार, एस.पी.पवार, तलाठी के.डी.कोळी, उमेश गोपनारायण, रोशन जाधव, एन. व्ही.गावित, शिपाई समाधान जाधव आदींचा समावेश होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here