पदवीधर मतदार संघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

0
43

देवळा ; नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची प्रारूप मतदार यादी आज (२३) रोजी देवळा तहसील कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीनी तसेच पदवीधर मतदारानी सदर मतदार यादीचे अवलोकन करून काही हरकत अगर सूचना दाखल करावयाची असेल त्यांनी ९ डिसेंबर पर्यंत निवडणूक शाखा, तहसील कार्यालय देवळा या ठिकाणी दाखल करू शकता.

तसेच ज्या पदवीधर मतदारांचे नाव प्रारूप मतदार यादीत नसेल त्यांनी दिनांक ९ डिसेंबर पर्यंत मंडळ अधिकारी लोहनेर व देवळा यांच्याकडे नमुना १८ मध्ये अर्ज करू भरून नाव समाविष्ट करून घ्यावे ,असे आवाहन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here