मुंबई: राज्यात पक्ष फुटीचे लोन वाढले असून मोठ्या पक्षापासून ते संघटनेनं पर्यंत हे लोण पसरले आहे. राज्याच्या राजकारणात ‘ज्याला नाही कुणी त्याला शिंदे गट वाली’ अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेने गेली दोन दशक चांगलाच दबदबा राज्याच्या राजकारणात निर्माण केला होता. मात्र त्यांनी जोडलेली कार्यकर्त्यांची माळ त्यांच्या अकाली निधनानंतर काही महत्वकांक्षी पदाधिकाऱ्यांमुळे संघटनेत दोन गट पडल्याने तुटते की काय असे चित्र निर्माण झाले आहे. तानाजी शिंदे विरुद्ध उदयकुमार आहेर हा संघर्ष शिगेला पोहोचला असून भाजपा सोबत असलेल्या शिवसंग्रामधील एका गटाने आता एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
युवकच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून उदयकुमार आहेर यांना हटवण्यात आल्यानंतर हे बंड महाराष्ट्रात झाले असून जवळपास 25 ते 26 जिल्हाध्यक्षसह 90 टक्के पदाधिकारी हे उदयकुमार आहेर यांच्या गटासोबत असल्याचा दावा आहेर यांनी केला आहे. या दाव्यानंतर तानाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत उत्तर देताना यापैकी कोणीही पदाधिकारी नसून यांच्या बोलण्याला अर्थ नाही शिवसंग्राम अबाधित असल्याचा दावा तानाजी शिंदे यांनी केला असून शिंदे गटाच्या उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले असून शिवसंग्राम संघटना फोडण्याचे पाप करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच राज्यातील मराठा समाज शिंदे गटाला धडा शिकवेल असा इशाराच दिला आहे.
या टीकेला उत्तर देताना आहेर चांगलेच संतापले असून आपली आदळ आपट थांबवा जबाबदारीचे भान ठेवून बोला असा सज्जड इशारा दिला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा शिवसंग्राम संघटनेचे दोन गट पडल्याचे चित्र आहे. उदय आहेर म्हणाले की आम्हीच शिवसंग्राम असून आम्ही गद्दार केली नाही किंवा बाहेर पडलो नाहीत. जवळपास 90 टक्के पदाधिकारी आमच्यासोबत आहेत आमची संघटना खरी असल्याचा इशारा आहेर यांनी दिला आहे. यामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे पॅटर्न निर्माण झाला आहे. फरक मात्र इतकाच की हे पदाधिकारी गुवाहाटी न जाता महाराष्ट्रात राहून बंड पुकारले आहे.
विनायक मेटे यांच्यासाठी उदयकुमार आहेर यांनी आपले राजकारण दावावर लावले असून अनेक ऑफर आजपर्यंत धुडकावल्या आहेत मात्र त्यांनाच तानाजी शिंदे यांनी पक्षातून बाजूला सारून चूक केल्याची भावना इतर पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. यामुळे हा संघर्ष कोणते वळण घेतो हे बघणं महत्वाचे आहे. येत्या आठवड्यात मुंबईत शिवसंग्राम संघटनेचा मेळावा होत असून या ठिकाणीं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थतीत उदयकुमार आहेर यांच्या नेतृत्वातील शिवसंग्राम मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.
पत्रकार परिषदेत काय झाले ?
उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसंग्रांचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पाहिलेली स्वप्न अर्थात अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे उभारण्यात येणारे स्मारक तसेच शेतकऱ्यांना पेन्शन योजना अशी अनेक काम पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्याय देणार असल्यल्याने सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे या पत्रकार परिषदेत सामंत यांनी सांगितले. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी सांगीतले की शिवसंग्राम मध्ये नेतृत्वाचा अभाव असून साहेबांचे स्वप्न पूर्तीसाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. यावेळी विदयार्थी प्रदेशाध्यक्ष शैलेश खरकटे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष पंजाबराव देशमुख व मराठवाडा विभागीय अध्यक्ष सचिन मिसाळ हे उपस्थित होते. शिवसंग्रामच्या 50 पदाधिकाऱ्यांनी 8 ते 10 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सर्व व्यथा मांडली होती. विनायक मेटे यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. या भेटीदरम्यान विनायक मेटे यांचे सर्व स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू तसेच शिवसंग्राम पक्षाला आम्ही सहकार्य करू असे एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.
शिवसंग्राम शिंदे गटाला समर्थन देण्याकरिता येत्या 8 ते 10 दिवसात मोठा मेळावा मुंबई मध्ये घेणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सामंत यांनी स्पष्ट केले. शिवसंग्रामचे अधिकारी फोडण्यासाठी किंवा कोणत्याही वेगळ्या कारणाने ही यंत्रणा वापरली नाही तर विनायक मेटे यांनी चालू केलेली चळवळ अपुरी राहू नये तिला पूर्तता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदत करणार आहेत. शिवसंग्रामचे बहुसंख्य अधिकारी हे मुख्यमंत्री शिंदे यांचं समर्थन करतात. याच कारणासाठी हा समर्थन मेळावा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसंग्राम पक्ष हा बाळासाहेबांची शिवसेना यामध्ये विलीन होत नसून ते शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. शिवसंग्राम पक्ष फोडण्याचा कोणताही विचार नाही.
हा मेळावा मराठा आरक्षण प्रश्नावर बोलण्यासाठी, अरबी समुद्रातील स्मारकाची भूमिका नक्की काय असणार या बाबत हा मेळावा होणार आहे. शिवसंग्रामच्या अधिकाऱ्यांना कोणतीही पद मिळणार नसून त्यांच्या कामावरून पुढील सर्व गोष्टी ठरवणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. कोणाचीही मन दुखावली जाणार नाही याची काळजी देखील आम्ही घेऊ अस सामंत म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम