द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. किम जोंग उन यांनी अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना इशारा दिला आहे. अमेरिकेने हल्ला केल्यास उत्तर कोरियाही अण्वस्त्रांनी हल्ला करेल, असे किम यांनी म्हटले आहे.
सततच्या धमक्यांना उत्तर कोरिया नक्कीच प्रत्युत्तर देईल, असेही ते म्हणाले. शनिवारी क्षेपणास्त्र चाचणी पाहण्यासाठी किम जोंग स्वतः उपस्थित होते. यावेळी त्यांनी अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांना धमकी दिली आहे. एक दिवस आधी उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्र सोडले होते. हे क्षेपणास्त्र समुद्राच्या दिशेने डागण्यात आले.
अमेरिकेच्या दबावाचे डावपेच आणि दक्षिण कोरिया-जपान प्रदेशातील त्यांच्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आल्याचे उत्तर कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे. क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या वेळी किम जोंग उन आपली मुलगी आणि पत्नीसह उपस्थित होते. या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणावर किम जोंग उन म्हणाले, ‘अमेरिका आणि त्याचे मित्र देश चिथावणी देण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाला आपल्या तयारीला वेग द्यावा लागणार आहे. उत्तर कोरियावर अण्वस्त्र हल्ला झाल्यास त्याला अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले.
उत्तर कोरियाने Hwasong-17 ICBM क्षेपणास्त्र सोडले. यापूर्वी 3 नोव्हेंबरला याच क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले होते. मात्र, चाचणी अयशस्वी ठरली होती. देशाला अण्वस्त्रांच्या बाबतीत सक्षम आणि शक्तिशाली बनवण्यासाठी ही चाचणी घेण्यात येत असल्याचे उत्तर कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला 1,000 किमी आणि उंची 6,041 किमी होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम