वनराई बंधाऱ्यांनी वाढणार पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी

0
22
घोडेवाडी शिवारात असलेल्या ओहळ ठिकाणी श्रमदानातून लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करतांना कृषी पर्यवेक्षक श्री पवार,कृषी सहाय्यक जयश्री गांगुर्डे,शेतकरी जगण घोडे,सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, अशोक राऊत आदींसह उपस्थित शेतकरी महिला माता बघिणी.(छाया : राम शिंदे).

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडेवाडी शिवारात इगतपुरी तालुका कृषी विभागाच्या वतीने व स्वदेश संस्थेच्या संकल्पनेतून व भक्तराज जटायू गाव विकास समितीच्या सौजन्याने घोडेवाडी ग्रामस्थांच्या सहभागातून नदी नाले,ओहळ क्षेत्रात वनराई बंधारे बांधून पाणी आडवा पाणी जिरवा हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.

घोडेवाडी शिवारात असलेल्या ओहळ ठिकाणी श्रमदानातून लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करतांना कृषी पर्यवेक्षक श्री पवारकृषी सहाय्यक जयश्री गांगुर्डेशेतकरी जगण घोडेसामाजिक कार्यकर्ते राम शिंदे अशोक राऊत आदींसह उपस्थित शेतकरी महिला माता बघिणीछाया राम शिंदे

आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित शेतकरी जगण घोडे, कृषी पर्यवेक्षक पवार ,कृषी सहाय्यक जयश्री गांगुर्डे, कृषी सहाय्यक अशोक राऊत, बायफ चे संजय थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून श्रमदानातून या बंधाऱ्यांची निर्मिती होत आहे.या उपक्रमामुळे गाव परिसरसतील सिंचन क्षेत्राचा विकास होणार आहे. यामुळे या भागातील पाण्याची पातळी उंचवणार आहे. याचा थेट फायदा येथील शेतकऱ्यांना होणार आहे.

यंदाच्या वर्षी इगतपुरी तालुक्यात दरवर्षी प्रमाणे सरासरीपेक्षा दहा पट जास्त हजेरी लावली आहे जवळपास इगतपुरी तालुक्यात सरासरी १००० पेक्षा अधिक मिलिमीटर पर्जन्यमान (अतिवृष्टी) यावर्षी पाहायला मिळाले. नद्या नाले, ओहळ परिसर पूर्णपणे दुथडी वाहत होता. या माध्यमातून पाण्याची मोठी उपलब्धता निर्माण झाली आहे. पण हे झालं पावसाळ्यापुरते पावसाळा गेला की इगतपुरी तालुक्यातील दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होते. या पाणी टंचाईचा थेट सामना आदिवासी भागातील शेतकरी ,महिला मातांबघिणीसोबतच मुक्या गुरे वासरे प्राण्यांनाही करावा लागतो आहे.

ही परिस्थिती बदलावी म्हणून ग्रामीण भागात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली जाते आहे. या लोकसहभागातून श्रमदानातून निर्मिती होणाऱ्या वनराई बंधाऱ्यांमुळे पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमाला मोठा आधार मिळणार आहे.याचा थेट फायदा त्या परिसरातील शेतकऱ्यांना होनार आहे यामुळे परिसरातील बोअरवेल,विहिर ओहळ यात मुबलक पाणी साचून राहणार असल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पण याचा मोठा फायदा होणार आहे.दरम्यान या लोकसहभागातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमामुळे या परिसरातील पाणलोट क्षेत्र सिंचन परिसरात पाण्याची पातळी नक्कीच वाढणार आहे.

यामुळे पाणलोट क्षेत्राचा पण विकास होण्यास मदत होणार आहे.दरम्यान बुधवार ता.१६ रोजी घोडेवाडी शिवारात कृषी विभाग व बायफ यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून वनराई बंधारा तयार करण्यात आला. वनराई बंधारा पूर्ण झाल्यानंतर अडवलेले पाणी बघून येथील शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी प्रगतिशील शेतकरी कृषी पर्यवेक्षक श्री पवार,जगण घोडे, कृषी सहाय्यक जयश्री गांगुर्डे, अशोक राऊत, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, बायफ चे थेटे सर, शेतकरी काळू जोशी, पांडुरंग निगळे, अनिल निगळे, लक्ष्मण गभाले, साहेबराव जोशी, संगीता धादवड, संजना घोडे, अनिता गभाले, वसंत जोशी, भाऊराव निगळे, सतीश गभाले, भक्तराज जटायू गाव विकास समिती आदींसह बहुसंख्य शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

“दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात नद्या नाले ओहळ कोरडे ठाक होतात परंतु वनराई बंधाऱ्यांमुळे यंदा सर्वत्र पाणी साचून आहे.याचा फायदा रब्बी हंगामात होत आहे.यासोबतच मुक्या प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.”
काळू जोशी, शेतकरी

“कृषी विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या वनराई बंधाऱ्यांमुळे या परिसरात पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमाला श्रमदानातून लोकसहभागातून ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे या उपक्रमामुळे या परिसरात सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊन पाणी टंचाई दूर होणार आहे याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.”
जयश्री गांगुर्डे, कृषी सहाय्यक टाकेद


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here