व्यापाऱ्याचे कांदे विकले परस्पर; देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
47

देवळा ; कांद्याची परस्पर विक्री करून तालुक्यातील उमराणे येथील कांदा व्यापाऱ्याची १ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी कि, उमराणे येथील रोशन ट्रेडर्स या कांदा गोडाऊन मधून जवळपास १ लाख ८० हजार रुपये किमतीचा एकूण १२ टन १२० किलो वजनाचा कांदा व १० हजार रुपये गाडी भाड्यापोटी आगाऊ रक्कम म्हणून असा १ लाख ९० हजार रुपयाचा कांदा दि ३ ऑक्टोबर रोजी कांदा व्यापारी रोशन राजाराम देवरे रा . उमराणे ता देवळा यांनी सुभाष ट्रान्सफोर्ट कंपनी मार्फत आरोपी सुधांशु बेहरा ( ट्रक चालक ) व मनोज साहू ( ट्रक मालक ) रा संबलपूर , ओरिसा राज्य यांच्याकडे ट्र्क क्रंमाक ( ओडी ०२/ बी यु २१३६ ) या गाडीत रोशन ट्रेडर्स या कांदा गोडाऊन मधून एकूण १२ टन १२० किलो वजनाचा अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीचा कांदा पश्चिम बंगाल राज्यातील खडकपूर येथील के जी एन ट्रेडर्स या कंपनीस पोहच करण्यासाठी ट्रक भरून दिला.

आरोपीने सदरचा कांदा खडकपूर येथील कंपनीत पोहच न करता परस्पर विक्री करून कांद्याची विल्लेवाट लावली . यामुळे कांदा व्यापारी रोशन राजाराम देवरे यांची आरोपीनी संगनमत करून १ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक तरुण नोकरी मिळत नसल्याने कर्ज काढून व्यापार व्यवसाय करीत आहेत , मात्र त्यांची अशा प्रकारे फसवणूक होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे . अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ करीत आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here