चोरीला गेलेला अँड्रॉइड फोन लगेच सापडेल -स्विच ऑफ केल्यानंतरही मिळेल मोबाईलचे लाईव्ह लोकेशन!!!

0
31

The point now – अँड्रॉईड फोन चोरीला गेल्यावरही सहज ट्रॅक करता येतो. यासाठी तुम्ही गुगलचेच फीचर फाइंड माय फोनची मदत घेऊ शकता. पण, आम्ही तुम्हाला एका वेगळ्या ॲप बद्दल सांगणार आहोत . याच्या मदतीने स्वीच ऑफ केल्यानंतरही फोन ट्रॅक करता येतो.

स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढला आहे. आपली अनेक कामे स्मार्टफोनशिवाय थांबतात. स्मार्टफोन हरवला की समस्या येते. कारण आपल्या फोनमध्ये आपली खूप महत्त्वाची माहिती असू शकते पण नो टेन्शन आम्ही तुम्हाला काही अश्या ॲप बद्दल सांगणार आहोत जेणेकरून तुमचा फोन तुम्हाला चोरी झाल्यानंतरही भेटेल. चोरीला गेलेला फोन तुम्ही सहजपणे ट्रॅक करू शकता. फोन बंद झाल्यानंतर त्याला ट्रॅक करणे खूप कठीण असते पण, तुम्ही फोन बंद केल्यानंतरही तो ट्रॅक करता येतो. यासाठी तुम्हाला अँड्रॉइड ॲपची मदत घ्यावी लागेल. संपूर्ण पद्धत येथे स्पष्ट केली आहे. पण, पुढे जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमचा फोन चोरीला गेला असेल, तर सर्वप्रथम पोलिसांत तक्रार करा.

तुम्ही पोलिसांना फोन ट्रॅक करण्याची विनंती देखील करू शकता. अनेक प्रकरणांमध्ये, पोलिस फोन ट्रॅक करतात आणि तो योग्य मालकाकडे सोपवतात. तथापि, आधीपासून काही सुरक्षा टिप्स अवलंबून तुम्ही तुमचा फोन सहजपणे ट्रॅक करू शकता. यासाठी अनेक ॲप्स सहज उपलब्ध होतील.येथे आपण Track it बद्दल बोलत आहोत . अँड्रॉईड युजर्स ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. त्याची रेटिंग देखील खूप चांगले आहे. हे हॅमर सिक्युरिटीने विकसित केले आहे. त्याची सेटअप प्रक्रिया अगदी सोपी आहे.

ॲप डाउनलोड केल्यानंतर, ते उघडा आणि काही परवानग्या द्या. यात डमी स्विच ऑफ आणि फ्लाइट मोडची सुविधा देखील आहे. यामुळे फोन स्वीच ऑफ केल्यानंतरही तो बंद होत नाही आणि आपल्याला आपल्या फोनचे ठिकाण कळते हे तुमच्या डिव्हाइसच्या सर्व क्रियाकलाप जसे की स्थान, ज्याच्या हातात फोन आहे त्या व्यक्तीचा सेल्फी आणि इतर तपशील तुमच्या दिलेल्या आपत्कालीन नंबरवर पाठवत राहील. हा ॲप फोनचे लाईव्ह लोकेशनही पाठवत राहतं.

यामुळे त्याचा पाठलाग घेणे खूप सोपे होते. तुम्हीही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी हे एक अतिशय उपयुक्त ॲप आहे. गुगल प्ले स्टोअरवरही याला खूप चांगले रेटिंग देण्यात आले आहे. फोन चोरीला गेल्यास हा ॲप तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here